नागपूर : मावशीच्या घरी राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नाझिया परवीन मीर हुसैन (वय २२) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. नाझिया ही मूळची गसनगर, बर्रा, बोकारो स्टील सिटी (झारखंड) येथील रहिवासी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिया परवीन ही माउंट रोडवरील रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या मावशीकडे राहते व तिचे काका रेल्वेत तांत्रिक विभागात अधिकारी आहेत. नाझिया ही हिस्लॉप कॉलेजमध्ये बीकॉमच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. महाविद्यालयाच्या अभ्यासासोबतच ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. सोमवारी नाझिया तिच्या खोलीत होती. संध्याकाळी सहा वाजता मावशीने नाझियाच्या खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा ती गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. तिने स्कार्फच्या सहाय्याने आत्महत्या केली होती. घटनेची माहिती सदर पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा – नवी मुंबई: महिला दिनी महिलांची जागृती व काव्य जागर

हेही वाचा – नवी मुंबई : होळीची वर्गणी कमी दिली म्हणून दोघांना जबर मारहाण; दुकानाचेही नुकसान

सदरच्या सहायक निरीक्षक भारती गुरुनुले या घटनास्थळी दाखल झाले. सुसाईड नोट न मिळाल्याने त्यांनी नाझियाची पुस्तके आणि मोबाइलची तपासणी केली. त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. नाझिया ही हुशार विद्यार्थिनी होती. सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl student preparing for the competitive exam committed suicide in nagpur adk 83 ssb