नागपूर : घराच्या समोर असलेल्या बाथरुममध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणीचा दोघांनी मोबाईलने व्हिडीओ काढला. त्यानंतर तिला बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. जगन पवार आणि करण लष्कर (सावनेर) अशी आरोपींची नावे असून ते मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
पीडित १७ वर्षीय तरुणी घरातील बाथरुमध्ये आंघोळ करीत होती. आरोपी जगन आणि करण यांनी दोघांनी चोरून तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला तसेच न्यूड फोटोही काढले. दोघांनीही २८ ऑगस्टला मुलीला रस्त्यावर गाठले. तिला मोबाईलमधील तिचा अश्लील व्हिडीओ दाखवला. ‘तू आम्हा दोघांसोबत एक रात्र झोप, नाहीतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणार’ अशी धमकी दिली. त्यामुळे ती घाबरली. तिला सूचत नव्हेत. त्यामुळे तिने मित्राला सांगितले. त्या मित्राने दोघांनाही गावातील मैदानावर गाठले.
हेही वाचा – नागपुरातील एसटी कार्यालयासमोर महिलेचे उपोषण.. विभाग नियंत्रकांच्या विरोधात…
हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथी बंद्यांकरीता स्वतंत्र व्यवस्था
‘माझ्या मैत्रिणीने तुमच्यासोबत झोपण्यास नकार दिल्याचे सांगून त्यांना मोबाईलमधील न्यूड व्हिडीओ डिलीट करायला सांगितले. मात्र, त्यांनी त्या युवकावर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.