अमरावती : आईने दुधातून दिलेले विष पिणाऱ्या ११ वर्षीय चिमुकलीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ११ मे रोजी मृत्यूशी सुरू झालेली तिची झुंज नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्‍णालयात संपली. मुलीला दुधातून विष देणाऱ्या आईविरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी हत्‍या, हत्‍येचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

अक्षरा अमोल जयसिंगकार (११, रा. अंजनसिंगी) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आपल्याला पोटाचा त्रास असल्याने आपल्या मृत्यूनंतर मुलांचे काय होणार, या भीतीपोटी आपण अक्षरा व लहानग्या मुलाला बोर्नव्हिटा टाकलेल्या दुधात विष कालवले होते. ते विषयुक्त दुध दोन्ही मुलांना देऊन स्वत:देखील घेतल्याची कबुली अक्षराची आई प्रिया अमोल जयसिंगकार (२८, रा. अंजनसिंगी) हिने कुऱ्हा पोलिसांना दिली आहे. ११ मे रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास अंजनसिंगी येथे ती धक्कादायक घटना घडली होती. घटनेवेळी चिमुकल्यांचे वडील अमोल जयसिंगकार हे कामासाठी घराबाहेर गेले होते.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल

हेही वाचा – गोंदिया जिल्हा परिषदेत शॉर्टसर्किटमुळे लागली आग; कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ …

अक्षरा व जय (७) यांनी ११ मे रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास आईकडून दूध घेतले. मात्र त्यादिवशी प्रिया हिने मुलांना बोर्नव्हिटा घातलेल्या दुधात उंदीर मारण्याचे विषारी औषध मिसळविले. ते दूध मुलांना प्यायला दिले. स्वत:देखील घेतले. हा प्रकार शेजाऱ्यांना माहिती होताच त्यांनी तिघा मायलेकांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. तेथे प्रिया जयसिंगकार व अक्षराचा जबाब नोंदवून घेण्‍यात आला. अक्षराची प्रकृती बिघडल्याने तिला नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, अक्षराने तेथे शेवटचा श्वास घेतला. त्याबाबत कुऱ्हा पोलिसांना माहिती देण्यात आली. आपल्याला पोटाचा असह्य त्रास होत असल्याने आपल्या मृत्यूनंतर मुलांचे काय होईल, या भीतीपोटी आपण ते कृत्य केल्याचा प्रिया हिचा जबाब आहे.