प्रेयसी दोन महिन्यांची गर्भवती असतानाच प्रियकराने तिच्याच मैत्रिणीशी सूत जुळवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. हा प्रकार उघडकीस येताच पहिल्या प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गुलशन उर्फ गोल्डी धनराम हरीनखेडे (वय २०, रा. एमआयडीसी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा >>> वाशिम : कोतवाल परीक्षा वादाच्या भोवऱ्यात! गुणाची टक्केवारी कमी आल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

पीडित १७ वर्षीय मुलगी स्विटी (बदललेले नाव) १२ वीची विद्यार्थिनी आहे. तिचे गेल्या १० महिन्यांपूर्वी गुलशनशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली. आरोपी गुलशन हा नळ दुरूस्तीची कामे करतो. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे सुरु झाले. आरोपी गुलशनने स्विटीला वारंवार वेगवेगळी आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने स्विटीला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी बोलावले. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा >>> “संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे म्हणाले, “महायुतीत आमच्या मंचावर ते येतील, त्यांच्या मंचावर..’

आरोपीने ३० ऑक्टोबर २०२२ ते २६ जुलै २०२३ असे सलग आठ महिने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर आरोपी गुलशन याने स्विटीच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. तो स्विटी आणि तिच्या मैत्रिणीसोबत दोघींनाही प्रेमसंबंध ठेवायला लागला. तिची मैत्रिणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दरम्यान, स्विटी दोन महिन्यांची गर्भवती झाली. त्यामुळे ती चांगलीच तणावात असताना लग्नासाठी तगादा लावायला लागली. गुलशन तिच्याच मैत्रिणीच्या प्रेमात पडल्याची बाब तिला समजली. प्रेमभंग झाल्यामुळे स्विटीने गुलशनला मैत्रिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत विचारणा केली. त्याने तिच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली. त्यामुळे चिडलेल्या स्विटीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आरोपी गुलशनविरुद्ध तक्रार दिली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी गुलशनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे

Story img Loader