नागपूर : एका युवकाने आपले अब्दूल हे नाव लपवून साहिल शर्मा असे सांगून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून लॉज, हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. काही महिन्यानंतर त्याने तिच्याशी अचानक संबंध तोडला आणि पळ काढला. प्रियकराच्या शोधात व्याकुळ प्रेयसीने त्याचा फोटोवरुन शोध घेणे सुरु केले. शोध घेत घेत ती त्याच्या घरी पोहचली. त्यावेळी तो पत्नी व मुलासह दिसला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. अब्दूल शारिक कुरेशी अब्दूल कुरेशी (३३, रा. आशीनगर, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी पूजा (काल्पनिक नाव) ही मुळची भंडाऱ्यातील एका खेडेगावातील आहे. तिची विवाहित बहिण यशोधरानगरात राहते. ती बहिणीकडे राहून शिक्षण घेत होती. शिकवणी वर्गाला जात असताना तिच्यावर आरोपी अब्दूल शारिकची नजर पडली.
अब्दूलचा आशीनगरात पानठेला असून तो विवाहित आहे. त्याला पत्नी व मुलगा आहे. त्याने स्वत:चे नाव साहिल शर्मा असल्याचे सांगून पूजाशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचेे आमिष दाखवून तिला कामठीतील ओयो हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबध प्रस्थापित केले. सप्टेबर २०२४ पासून ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्याने तिच्याकडून अनेकदा शारीरिक सुख घेतले. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. पूजाने अब्दूलच्या फोटो अनेकांना दाखविल्यानंतर त्याच्या घराचा शोध लावला. घरात तो पत्नी व मुलांसह दिसला. तिने लगेच त्याच्या पत्नीला विचारणा केली. पतीला प्रियकर म्हणताच त्या पूजाशी अब्दूलच्या पत्नीने वाद घातला. सुरुवातीला पूजाला ओळखत नाही, अशी भूमिका अब्दूलने घेतली. तिचा प्रियकर साहील शर्मा असून मी अब्दूल असल्याचा विश्वास पत्नीला दिला. मात्र, पूजाने दोघांचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवरुन प्रियकराच्या पत्नीला दाखवले. त्याच्या पत्नीला सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर पूजा थेट पाचपावली पोलीस ठाण्यात गेली. तिने लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अब्दूल शारिकवर गुन्हा दाखल करुन अटक केली.
पत्नी मुलासह गेली माहेरी
पूजाने प्रियकर साहिल शर्मा हाच अब्दूल शारिक असल्याचे पटवून दिल्यामुळे पत्नीने अब्दूलला विचारणा केली. मात्र, अब्दूल निरुत्तर झाल्यामुळे दोघींनी त्याची चांगली धुलाई केली. पत्नीने लगेच मुलाला घेऊन माहेर गाठले. पुन्हा कधीच परत येणार नसल्याचे बजावले. दुसरीकडे पूजाने बलात्काराची तक्रार दिली.