लोकसत्ता टीम

बुलढाणा : महाराष्ट्रासह देशातील लाखो हत्तीरोग बाधितांना ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य, आयुश, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी देशातील आरोग्य यंत्रणांना आज दिले. याचा शुभारंभ बुलढाण्यातून करण्यात आला. जिल्ह्यातील एका हत्तीरोग बाधित महिलेला आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते आज अपंगत्वाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा शुभारंभ आज राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला. मेहकर येथील महाराष्ट्र अर्बन बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

आणखी वाचा-चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

या शुभारंभपर कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव वंदना यांच्यासह बिहार, झारखंड, ओडीसा, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, या राज्याचे आरोग्यमंत्री तसेच ग्रामविकास, कृषी महिला व बाल कल्याण, शिक्षण, अल्पसंख्याक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले. दृकश्राव्य पद्धतीने या बैठकीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना यावेळी जाधव यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील तब्बल २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आहे. या राज्यांत ‘लिम्फैटिक फाइलेरियासिस’ अर्थात हत्तीरोगाचे साडेसात लाख रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या रोगाने बाधित रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र शासन आणि आरोग्य मंत्रालय कटिबद्ध आहे. हत्तीरोग हा आजार कायमस्वरूपी असल्याने बाधित रुग्णांना ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्यावे, असे आदेश त्यांनी आरोग्य यंत्रणांना दिले. यामुळे अशा रुग्णांना ४५ टक्के अपंगत्वाचे इतर लाभ सुद्धा मिळू शकतील. याचा शुभारंभ याच कार्यक्रमात करण्यात आला. ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र मंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील एका हत्तीरोगग्रस्त महिलेला देण्यात आले.

आणखी वाचा-यवतमाळ : थॅलेसेमिया, सिकलसेलचे १५ हजार रुग्ण, सुविधांअभावी पाच दगावले?

पंचमुखी योजना

यावेळी नामदार प्रतापराव जाधव म्हणाले की, देशातून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मागील वर्षी सन २०२३ पासून केंद्र सरकारच्यावतीने पंचमुखी रणनीती योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत या रोगाचा प्रसार थांबण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात बाधित क्षेत्रात मोहीम स्वरूपात नागरिकांमध्ये करण्यात येते. मागील वर्षी या अभियानाला बाधित क्षेत्रातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जवळपास ८२ टक्के लोकांपर्यंत हे अभियान पोहचले होते. यावर्षी ‘एमडीए’ अभियानाच्या पहिल्याच टप्प्यात अकरा राज्यातील ९६ जिल्ह्यातील ९५ टक्के लाभार्थ्यांपर्यंत या प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

भविष्यात हत्तीरोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन बाधीत क्षेत्रातील प्रत्येकानी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डासाच्या दंशाने हत्तीरोग होत असल्याने मच्छरदाणीसारख्या बचावात्मक संसाधनाच्या उपयोगासंदर्भात सरकारच्यावतीने सकारात्मक भूमिका घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनात भारत चिकित्सा सेवा ही सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगतीचा पल्ला गाठत असल्याचे जाधव यावेळी म्हणाले.

Story img Loader