नागपूर : हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये एसआयटी, खोके, बोके यावर चर्चा होत असताना विदर्भाच्या प्रश्नावर मात्र कुठलीही चर्चा नाही. कुठल्याही राजकीय पक्षातील नेत्यांना विदर्भाविषयी काही देणे घेणे नाही. २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य द्या अन्यथा तेलंगणच्या धर्तीवर विदर्भात आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आमदार व विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिला.
विदर्भ आज दुर्लक्षित असून राज्य सरकार व अन्य राजकीय पक्षांतील नेत्यांना विदर्भाविषयी काही देणे घेणे नाही. एकमेकावर आरोप करण्याच्या पलिकडे हिवाळी अधिवेशनात कुठल्याच प्रश्नावर चर्चा होत नाही, विदर्भातील अनेक प्रकल्प थंडबस्त्यात आहे. सरकार कोणाचे असो विदर्भाकडे राज्यकर्त्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
हेही वाचा: तरुणीने आधी बाळाला दिला जन्म मग दाखल केली बलात्काराची तक्रार, विवाहित प्रियकर फरार…
५ लाख कोटी रुपये अनुशेषाच्या रकमेसह स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच विदर्भातील जनतेचा मानवाधिकार आणि संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे २०२३ पर्यंत विदर्भ द्या अन्यथा तेलंगणच्या धर्तीवर आंदोेलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी अविनाश काळे उपस्थित होते.