नागपूर: मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे १८७८ मध्ये सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे.
– पहिले संमेलन १८७८ मध्ये पुणे येथे पार पडले.
– यानंतर १९०९ मध्ये म्हणजेच तब्बल २१ वर्षांनी सातवे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.
– १९१७ मध्ये म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी दहावे संमेलन मध्यप्रदेश मधील इंदूर येथे पार पडले.
-१९२१ मध्ये तब्बल चार वर्षांनी अकरावे संमेलन बडोदा (गुजरात ) येथे पार पडले.
-१९२८ मध्ये तब्बल सात वर्षांनी चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पार पडले.
-१९२९ मध्ये पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.
-१९३० मध्ये सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.
– १९३१ मध्ये सतरावे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.
– १९३४ मध्ये तब्बल चार वर्षांनी विसावे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.
– १९३५ मध्ये एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पार पडले.
– १९४६ मध्ये तब्बल अकरा वर्षांनी ३० वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.
– १९४७ मध्ये ३१ वे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.
– १९५१ मध्ये तब्बल चार वर्षांनी ३४ वे संमेलन कर्नाटक मधील कारवार येथे पार पडले.
– १९५३ मध्ये ३६ वे संमेलन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.
– १९५४ मध्ये ३७ वे संमेलन दिल्ली येथे पार पडले.
-१९६१ मध्ये ४३ वे संमेलन तब्बल सात वर्षांनी मध्यप्रदेशमधील ग्वालेहर येथे पार पडले.
– १९६४ मध्ये ४५ वे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.
– १९६७ मध्ये ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.
– १९८१ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.
– २००० मध्ये ७३ वे संमेलन तब्बल १९ वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.
– २००१ मध्ये ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.
– २०१५ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर २०१८
– २०१८ मध्ये ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले. यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ मध्ये ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.