नागपूर : मतदार नोंदणीसाठी आता निवडणूक कार्यालयात जाण्याची गरज नाही, ऑनलाईन नोंदणी करता येत नसेल तरी काही अडचण नाही, घराजवळच्या सरकारी रेशन दुकानात गेले तरी मतदार नोंदणी करता येईल, इतकी सुलभ व्यवस्था नागपुरात करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानात (रेशन दुकानात) नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे व दुरुस्तीबाबत सर्व अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – उपराजधानीत आणखी एका बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा छडा, तीन दिवसांच्या बाळाची तीन लाखांत विक्री

हेही वाचा – धान्य तस्करीतून पूर्व विदर्भात दरवर्षी हजार कोटींचा घोटाळा? मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मुख्य घोटाळेबाज मोकाट

पश्चिम नागपूरमध्ये याची सुरुवात होणार आहे. यासंदर्भात पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली स्वस्त धान्य दुकान चालकांची बैठक झाली. त्यांना मतदार नोंदणीबाबत माहिती देण्यात आली. याबाबतची माहिती प्रत्येक दुकानाच्या फलकावर लावण्यात आली आहे. नोंदणी करताना काही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांक १९५० वर संपर्क करावा.