वर्धा : रहस्यमय चित्रपटात शोभावी अशी घटना ते सुद्धा ग्रामीण भागत उजेडात आली आहे. वर्धा जिल्ह्यातून सूरू झालेला हा कथापट बैतुल जिल्ह्यात उलगडला. झाले असे की सिंदी रेल्वे येथे युगल सत्यनारायण अवचट पशुपालक राहतात. त्यांच्या मालकीच्या शेळ्या चोरून नेतांनाच देखरेख ठेवणारे सालकरी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती.तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सूरू केला. त्यात सात व्यक्तींना ताब्यात घेत विचारपूस सूरू झाली अन धक्कादायक माहिती पुढे आली.
अवचाट यांची शेतीचे परसोडी शिवारात आहे. त्यास शेळी पालणाची जोड देत शेतात गोठा बांधला. देखभालीसाठी सालकरी म्हणून विठ्ठल परसके राळेगाव तसेच रामा बोरीकर यांना कामावर ठेवले.घटनेच्या दिवशी अवचट हे शेतात गेल्यावर त्यांना धक्काच बसला. मोठ्या प्रमाणात शेळ्या गायब झाल्या होत्या. तसेच दोन्ही सालकरी आढळून आले नाही. त्यांनी तडक पोलीस ठाणे गाठले. तपास सूरू झाला असतांनाच दोन्ही सालकरी दरम्यान गावात परतले. त्यांनी सांगितले की बुधवारी रात्री काही अज्ञात इसमांनी गोठ्याचा दरवाजा तोडला. त्यानंतर सालकरी परचाके व बोरीकर यांना मारहाण केली. चाकूच्या धाकावर दोघांचे अपहरण केले. शेळ्या नेत या दोघांच्या डोळ्यास पट्टी बांधून सोबत घेऊन गेले. चोरी केलेल्या शेळ्यांची मध्यप्रदेशात विक्री केली.
हेही वाचा…राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट
विक्रीतून आलेली काही रक्कम या दोघांच्या हातात दिली.एवढेच नव्हे तर हे दोघे रक्कम स्वीकारत असल्याचा व्हिडीओही शूट केला. नंतर पैसे हिसकून घेत दोन हजार रुपये त्यांच्या हाती देत पळून जाण्याचा सल्ला दिला.मालकास किंवा पोलीसांना या घटनेची माहिती दिली तर ठार मारण्याची धमकी पण दिली. या दोघांना नंतर बैतुल शहरालगत सोडून देत भामट्यानी पोबारा केला.
हेही वाचा…विश्लेषण : खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण काय?
शेवटी या सालकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडत कसेबसे नागपूर गाठले. एकदाचे शेवटी ते गावी सिंदीत पोहचले. या प्रकरणी सात लोकांना ताब्यात घेवून कसून चौकशी सुरू केली.