नागपूर : ‘तो’ क्रिकेटचा देव म्हणनू सर्वश्रूत असला तरी त्याला देखील कुणाचा ना कुणाचा मोह आहेच. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याचे व्याघ्रप्रेम जगजाहीर आहे आणि या व्याघ्रदर्शनासाठी त्याची पहिली पसंती महाराष्ट्रालाच राहिली आहे. त्यामुळे तो ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात हमखास येतो.

मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की, ताडोबा ही त्याची पहिली पसंती नव्हती, तर व्याघ्रदर्शनासाठी त्याचे पहिले पाऊल हे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात पडले होते. ‘जय’ या अल्पावधीतच जगप्रसिद्ध झालेल्या आणि तेवढ्याच वेगाने सर्वांपासून दूर गेलेल्या वाघाने सचिन तेंडूलकरला लळा लावला होता. या अभयारण्यात त्याने पहिल्यांदा पाऊल ठेवले होते आणि त्यानंतर अनिल कुंबळेपासून तर इतरही क्रिकेटपटूंची पावले या अभयारण्याकडे वळली. आता या ‘मास्टरब्लास्टर’ची वारी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात होत असली तरी या व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला वनक्षेत्रातील वाघांचा त्याला लळा लागला आहे. या परिसरातील मंदिरासमोर नतमस्तक होणाऱ्या वाघासमोर सचिन तेंडूलकर नतमस्तक झाला आहे.

हेही वाचा… भंडाऱ्यात इंग्रजीचा पेपर पाहून विद्यार्थीनी झाली बेशुद्ध; ‘कॉपी मुक्त’सोबतच ‘ताण मुक्त’ अभियानही राबवण्याची गरज!

हेही वाचा… चंद्रपूर : चित्र प्रदर्शनातून काँग्रेसकडून मोदी सरकारची पोलखोल

वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी या परिसरातील वाघांच्या काढलेल्या छायाचित्रांनी अनेकांना मोह घातला आहे. त्यातून क्रिकेटचा देव देखील सुटला नाही. इंद्रजित मडावी यांनी जेव्हा सचिन तेंडूलकरला मंदिरासमोर नतमस्तक झालेल्या वाघाचे भलेमोठे छायाचित्र भेट म्हणून दिले, तेव्हा हा क्रिकेटचा देव त्यासमोर नतमस्तक झाला. त्याने इंद्रजित मडावी यांच्याकडून त्या वाघाची संपूर्ण कथा जाणून घेतली.

Story img Loader