नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयातून घराकडे जात असताना जामठ्याजवळील जंगलात एका गुराख्याने कुऱ्हाडीचा धाक दाखवून विद्यार्थिनीला अडविले. जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. हिंगणा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीडित २२ वर्षीय तरुणी मूळची यवतमाळची आहे. ती हिंगण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बुधवारी ती यवतमाळवरून बसने नागपुरात आली. महाविद्यालय काही अंतरावर असल्यामुळे पायी जात होती. तो भाग जंगलाचा आहे. काही वेळातच  एक गुराखी कुऱ्हाड घेऊन पाठलाग करायला लागला. त्याने तरुणीला गाठले आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिला जंगलात नेले. तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा >>> गोंदियात हनीट्रॅप, इन्स्टाग्रामवर मैत्री अन् अश्लील चित्रफीत बनवून ब्लॅकमेलिंग; व्यावसायिकाकडून उकळले २ लाख रुपये

या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. गुराखी तरुण पाठलाग करीत असल्यामुळे घाबरलेल्या तरुणीने बहिणीला फोन केला. बहिणीशी बोलतानाच त्याने तिचा भ्रमणध्वनी हिसकला आणि फोडला. त्यानंतर बहिणीने हिंगणा पोलिसांना माहिती दिली. तासाभराने हिंगणा पोलीस घटनास्थळावर पोहचले. तेथे भेदरलेल्या अवस्थेत तरुणी आढळून आली.