नागपूर: अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात प्रथम घसरण व त्यानंतर चांगलीच वाढ झाली होती. हे दर विक्रमी उंचीवर म्हणजे प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत पोहचले होते. परंतु गेल्या दोन दिवसांत पुन्हा सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नासह विविध कार्यक्रमानिमित्त सोने- चांदिचे दागिने खरेदीसाठी इच्छुक कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरसह सर्वत्र मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार रुपयांपर्यंत विक्रमी उंचीवर पोहोचले होते. त्यानंतर हे दर प्रति दहा ग्राम ७२ हजारांहून खाली घसरले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेत ७३ हजार ३०० रुपयांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर काही दिवस दरात घसरण झाली असली तरी त्यानंतर हे दर पुन्हा विक्रमी उंचीवर पोहचले.

हेही वाचा…‘आरटीई’ घोटाळ्यात पालकही अडकले; दोघांना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान नागपूर सराफा बाजारातील दरानुसार गुरूवारी (२३ मे) हे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार २००, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ८९ हजार ९०० रुपये होते. दरम्यान हे दर २० मे रोजी दुपारी २ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ८००, १८ कॅरेटसाठी ५८ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ९३ हजार ८०० रुपये होते. त्यामुळे २० मे रोजीच्या तुलनेत नागपुरात २३ मे रोजीच्या तीन दिवसांच्या दराची तुलना केल्यास सोन्याच्या २४ कॅरेटमध्ये दर तब्बल १ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार ३०० कॅरेट, १४ कॅरेटमध्ये १ हजार २०० रुपयांनी खाली घसरले. तर चांदीच्या दरातही ३ हजार ९०० रुपये घसरण झाली. त्यामुळे लग्न, बारसेसह विविध कार्यक्रमानिमित्त दागिने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून आंतराष्ट्रीय घडामोडीचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असून त्यामुळेच दर वाढत असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा…ऊन-पावसाचा लपंडाव! कुठे पावसाच्या सरी तर कुठे घामाच्या धारा; हवामान खाते म्हणते…

चांदीच्याही दरातही मोठी घसरण

नागपूरसह देशभरात मध्यंतरी चांदीच्या दरात खूप वाढ झाली होती. परंतु नागपूर सराफा बाजारात २३ मे २०२४ रोजी चांदीचे दर प्रति किलो ८९ हजार ९०० रुपये किलो नोंदवले गेले. हे दर २० मे २०२४ रोजी ९३ हजार ८०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे आठवड्याभरात नागपुरात चांदीच्या दरात तब्बल ३ हजार ४०० रुपये घसरण झाल्याचे चित्र आहे.