नागपूर: नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी (३१ डिसेंबर २०२४ रोजी) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. लग्न सराईच्या काळात दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

घराघरात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काही कुटुंबियांकडून शेती, फार्महाऊस, पर्यटन स्थळ अथवा हाॅटेल्स वा इतरत्र नववर्षाचे स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षात, लग्न, वाढदिवस वा इतर कार्यक्रमात काही नागरिक आपल्या जवळच्या नातेवाईकांना विविध दागिन्यांची भेट देत असतात. त्यामुळे हल्ली नागपूरसह सर्वत्र सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. परंतु मागील काही दिवसांत सोन्याचे दर सातत्याने वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती.

gold investment returns loksatta news
सोने – २०२४ मधील सर्वोत्तम २३ टक्के लाभ देणारी मालमत्ता, मौल्यवान धातूच्या झळाळीला ९०,००० रुपयांची भाव-पातळी खुणावतेय!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
akshaya deodhar new year plan
“आता कामात ब्रेक नाही…”, नव्या वर्षात पाठकबाईंनी केले ‘हे’ ३ नवे संकल्प! अक्षया देवधर म्हणाली…
In 2025 Check Gold silver rate today on January 1
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहे सोन्याचा दर? मुंबई ते पुणे, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे भाव
Santosh Deshmukh brother dhananjay deshmukh
Walmik Karad Breaking News : वाल्मिक कराड पुढे येताच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी मागितले संरक्षण
kamala harris speech after defeat from donald trump
Video: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कमला हॅरिस यांचं भावनिक भाषण; म्हणाल्या, “या निवडणुकीचे परिणाम…”

हेही वाचा – यवतमाळ : आरपीआय जिल्हाध्यक्षाचा शासकीय कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर) २०२४ रोजी सन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सराफा बाजारात ३१ मार्च २०२४ रोजी दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. हे दर २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २७ डिसेंबरच्या तुलनेत ३१ डिसेंबरला सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसते. ही घट २४ कॅरेटमध्ये ७०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ६०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ६०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ५०० रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे. येत्या काळात आणखी वाढ होण्याचे संकेत असल्याने ही सोने- चांदीच्या दागिन्यात गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

हेही वाचा – एका लग्नाची दुसरी गोष्ट! निवृत्तीच्या वयात १४ जोडपी अडकली विवाहबंधनात

चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात २७ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता चांदीचे दर ८९ हजार ५०० रुपये प्रति किलो होते. हे दर ३१ डिसेंबरला दुपारी ८६ हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे २७ डिसेंबरच्या तुलनेत नागपुरात ३१ डिसेंबरला चांदीच्या दरात तब्बल ३ हजार रुपये प्रति किलो इतकी मोठी घट नोंदवली गेली.

Story img Loader