नागपूर: उपराजधानीत यंदाच्या दिवाळीत गेल्यावर्षीच्या तुलनेत सोने- चांदीच्या दागिन्याची विक्री तब्बल ३० टक्यांनी वाढली आहे. परंतु गेल्या पाच दिवसांची तुलनात केल्यास २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २० रुपयांनी तर चांदीचे दर किलोमागे १ हजार १०० रुपयांनी वाढले आहे.दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी नागपुरात सोने- चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. यादिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम ६० हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार ५०० रुपये होते.
तर चांदीचे दर प्रति किलो ७२ हजार रुपये होते. तर बुधवारी (१५ नोव्हेंबर) दुपारी १ वाजता नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार ९०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार ६०० रुपये होते. चांदीचे दर प्रति किलो ७३ हजार १०० रुपये नोंदवले गेले. हे दर आणखी वाढण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी दिले.