नागपूर: देशभरात सातत्याने सोने- चांदीच्या दरामध्ये चांगलेच चढ- उतार बघायला मिळत आहे. हे दर स्थिर होत नसल्याने विविध कार्यक्रमासाठी दागीने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या मनात गोंधळ बघायला मिळत आहे. शनिवारीही (१३ जुलै) नागपुरातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर शनिवारी (१३ जुलै) सकाळी ११ वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७३ हजार १०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. हे दर ९ जुलैला ७२ हजार ६०० रुपये होते. तर ११ जुलैला ७३ हजार १०० रुपये नोंदवण्यात आले. त्यापूर्वी काही महिन्यापूर्वी हे दर ७२ हजार रुपयाहून खालीही गेले होते. त्यामुळे सोन्याच्या दरात सतत चढ- उतारामुळे सोने खरेदी करायची केव्हा याबाबत ग्राहकांच्या मनात गोंधळ निर्माण होतांना दिसत आहे.

हेही वाचा : राज्यात विजेच्या मागणीत मोठी घट; पावसामुळे…

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिली जातात. त्यामुळे आताही सराफा बाजारात कमी- अधिक प्रमाणात ग्राहकांची रेल- चेल दिसत आहे. नागपुरात १३ जुलैला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७३ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ५०० रुपये होते. हे दर ९ जुलैला २४ कॅरेटसाठी ७२ हजार ६०० रूपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ५०० रूपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार २०० रुपये होते. त्यामुळे सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी सोने- चांदीच्या दरात लवकरच आणखी वाढ होण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे हा काळ ग्राहकांना दागिने खरेदीसाठी चांगला असल्याचा त्यांचा दावा आहे.

चांदीच्या दरात मात्र वाढ

नागपूर सराफा बाजारात १३ जुलैला चांदीचे दर प्रति किलो ९२ हजार ७०० रुपये नोंदवण्यात आले. हे दर ८ जुलैच्या सकाळी ९ वाजता ९२ हजार तर ९ जुलैच्या दुपारी ३ वाजता ९२ हजार २०० रुपये किलो होते. त्यामुळे चांदीच्या दरात मात्र प्रति किलो सतत वाढ होतांनाचे चित्र आहे.

हेही वाचा : काँग्रेसचा चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघांवर दावा, आघाडीत बिघाडीची…

वीस दिवसांपूर्वी हे होते दर…

नागपुरातील सराफा बाजारात २२ जूनला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७१ हजार ८००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ८००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८९ हजार रुपये होते. त्यामुळे सोन्यच्या दरात पंधरादिवसांत चांगलीच वाढ झालेली दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold and silver rates today fluctuations in gold prices mnb 82 css
Show comments