यवतमाळ : शहरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दोन धाडसी घरफोडींचा उलगडा झाला असून दोघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण सहा लाख ४७ हजार ८५१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

किसन उर्फ क्रिष्णा किशोर राठोड (२१, रा. आठवडीबाजार नेर), राज राजधानी राठोड (२८, रा. अशोकनगर, नेर), अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. ८ जून रोजी गिरीजानगरात व ११ जूनला ड्रीमलॅण्ड सिटीत धाडसी घरफोडीची घटना घडली होती. आकाश रमेश फलके (३३, रा. ड्रिमलॅण्ड सिटी) या तरुणाच्या घरातील लोखंडी कपाट फोडून सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, रिंगजोड, कानातील टॉप्स, नेकलेस, सोन्याचे दोन लेडीज पदके, लॉकेट, लहान बाळाचे मनगटी दागिने असा एकूण पाच लाख ५७ हजार ८५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तर, प्रभाकर रघुनाथ टाके (७० रा. गिरीजानगर) यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्याने ९० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
the survey team of the administration seized gold worth 35 lakhs In Ratnagiri
रत्नागिरीत प्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाने ३५ लाखांचे सोने पकडले
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

हेही वाचा – मांज्यामुळे जायबंदी झालेला ‘ब्लॅक ईगल’ नैसर्गिक अधिवासात मुक्त; पायाला रिंग लावून घेतली भरारी..

हेही वाचा – अमरावती : रक्‍कम परत मिळवून देण्‍याच्या नावावर ९४ हजारांनी गंडविले; ‘हे’ ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले अन्..

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने रेकॉर्डवरील आरोपी तपासण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. क्रिष्णा व राज हे दोघे जण आझाद मैदानात चोरीतील सोन्याचे दागीने विक्रीसाठी घेऊन उभे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ आझाद मैदान गाठून शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळी दोघे जण संशयास्पदरीत्या फिरताना मिळून आले. राज राठोड याच्या अंगझडतीत एक सोन्याचे पदक, काळे मनी, असलेली ९० हजार रुपयाची पोत मिळून आली. त्यास पोतबाबत विचारणा केली असता, क्रिष्णा याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. किसन उर्फ क्रिष्णा याच्या अंगझडतीत सोन्याच्या चार अंगठ्या, सोन्याची लेडीज अंगठी, रिंगजोड, पट्टेवाले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा नेकलेस, सोन्याचे दोन लेडीज पदक, तीन गोल मणी पदक, असा पाच लाख ५७ हजार ८५१ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. अशाप्रकारे गिरीजानगर व ड्रिमलॅण्ड सिटी येथील चोरीच्या घटनेतील सहा लाख ४७ हजार ८५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांना पुढील चौकशीसाठी यवतमाळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांच्यासह पथकाने केली.