नागपूर: नागपूरसह देशभरात सोन्याचे दर स्थिर होण्याचे चिन्ह दिसत नाही. मध्यंतरी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रती दहा ग्राम ७५ हजारापर्यंत गेले होते. परंतु आता हे दर ७२ हजारांच्या जवळपास जात आहे. दरम्यान गुरूवारी (२० जून) नागपुरात सराफा बाजारात सोन्याचे दर तीन वेळा बदलले. वारंवार सोन्याच्या दरात बदल होत असल्याने ग्राहकांच्या मनात सोनं खरेदीबाबत गोंधळ दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिले जातात. त्यामुळे आताही या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कमी- अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहे. त्यामुळे आताही नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे गर्दी आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात २० जूनला सकाळी १०.३० वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅमसाठी ७२ हजार ३००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार २००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ९० हजार ६०० रुपये होता.

हेही वाचा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, यवतमाळच्या वणी तालुक्यातील संतापजनक घटना

दरम्यान गुरूवारी दुपारी ४.३० वाजता हे दर २४ कॅरेटसाठी ७२ हजार ४००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ३००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार १०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ९० हजार ६०० रुपये होता. तर २० जूनला संध्याकाळी ७.३० वाजता नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७२ हजार ६००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ५००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार २०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९० हजार ९०० रुपये होते. त्यामुळे सोने- चांदीचे दर सतत वाढतांना दिसत आहे.

हेही वाचा : “निर्लज्जम सदा सुखी… गद्दार तर गद्दारच राहतो”, अरविंद सावंत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

दरम्यान १९ जूनला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७१ हजार ९००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ९००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८८ हजार ९०० रुपये तर १० जूनला २४ कॅरेटसाठी ७१ हजार २००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार २००, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ३०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८९ हजार रुपये होते, हे विशेष. दरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षांची स्थिती बघितल्यास सोन्याचे दर सतत वाढतांना दिसत आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. आताही दर कमी असल्याने गुंतवणूक फायद्याची असल्याचे सराफा व्यवसायिकांचे म्हणने आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold price changed thrice in 9 hours today gold rates mnb 82 css
Show comments