नागपूर : दिवाळीच्या मुहर्तावर मोठ्या संख्येने ग्राहक सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. या दिवशी बाजारात ग्राहकांची गर्दी असते. दिवाळीच्या तोंडावर नागपुरात सोने- चांदीचे दर जास्तच वाढल्याने चिंता व्यक्त होत होती. परंतु धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आता सराफा बाजारात दिवाळीत ग्राहकांचा प्रतिसाद कसा राहिल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हल्ली सोन्याच्या दर उंचीवर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दिवाळीपूर्वी नागपुरातील सराफा बाजारात २४ ऑक्टोंबरला बाजार बंद होतांना रात्री सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार २०० रुपये नोंदवले गेले होते. शुक्रवारी (२५ ऑक्टोंबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर गुरूवारी रात्रीच्या तुलनेत किंचित कमी झाले आहे.
हेही वाचा…Video : ताडोबातील “कॉलरवाली” आणि तिचे बछडे..
दरम्यान नागपुरात २८ ऑक्टोंबरला सराफा बाजारात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे दिवालीच्या काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान दिवाळीत ग्राहक मोठ्या संख्येने सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. तर लग्न समारंभ, बारसे आणि इतरही अनेक कार्यक्रमात ग्राहक भेट म्हणून सोने- चांदीचेही दागिने देतात. त्यामुळे या काळात सोने- चांदीच्या दराकडे ग्राहकांचे विशेष लक्ष राहते. दरम्यान आता दर जास्त असले तरी पुढे ते आणखी वाढण्याचा अंदाज सराफा व्यवसायिक वर्तवत आहे.
हेही वाचा…नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
चांदीच्या दरातही मोठी घसरण…
दिवाळीच्या तोंडावर नागपुरातील सराफा बाजारात २४ ऑक्टोबरला (सोमवारी) रात्री बाजार बंद होतांना चांदीचे दर प्रति किलो ९८ हजार ९०० रुपये नोंदवण्यात आले होते. परंतु हे दर २८ ऑक्टोंबरला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी ११ वाजता ९६ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपूरात चांदीच्या दरात प्रत्येक किलोमागे तब्बल २ हजार १०० रुपये घट झाली आहे. दरम्यान दिवाळीत धनत्रयोदशीसह इतर दिवशी ग्राहक मोठ्या संख्येने चांदीची नाणी खरेदी करतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत ग्राहकांचा जोर कोणत्या खरेदीवर राहिल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.