नागपूर: सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु चांदीच्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. शुक्रवारी (२४ मार्च २०२५ रोजी) सोने- चांदीचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपूरसह देशभरात मागील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट बघायला मिळाली होती. केंद्र सरकारने सोन्यावरील सिमा शुल्क कमी केल्याने हे दर कमी झाले होते. परंतु त्यानंतर पून्हा सातत्याने देशभरात सोने- चांदीच्या दरात दरवाढ बघायला मिळत आहे. आता सोन्याचे दर विक्रमी उंचिवर पोहचले होते. त्यात किंचित घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (२१ मार्च २०२५) सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६९ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ७०० रुपये नोंदवले गेले.

हे दर आज सोमवारी (२४ मार्च २०२५ रोजी) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८८ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६८ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात २१ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत २४ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे लग्नसमारंभ, वाढदिवसासह इतर कार्यक्रमात दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

चांदीच्या दरात…

नागपुरातील सराफा बाजारात २१ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९८ हजार ५०० रुपये होते. हे दर आज सोमवारी (२४ मार्च २०२५ रोजी) प्रति किलो ९८ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर २१ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत २४ मार्च २०२५ रोजी नागपुरात चांदीचे दर प्रति किलो ३०० रुपयांना वाढलेले दिसत आहे. दरम्यान नागपुरात २० मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो १ लाख ७०० रुपये होते, हे विशेष.