नागपूरः नागपूरसह देशभरात सोन्याच्या दरात सातत्याने चढ – उतार बघायला मिळत आहे. २२ ऑगस्टला (मंगळवारी) नागपुरात सोन्याच्या दर वाढून प्रति दहा ग्राम ५९ हजार रुपये नोंदवले गेले.
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २२ ऑगस्ट २०२३ रोजी (गुरुवारी) नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार १०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ७०० रुपये होता.
हेही वाचा… बुलढाणा: बस व दुचाकीची धडक; एक ठार, दोघे गंभीर
हे दर १७ ऑगस्ट २०२३ रोजी नागपुरात २४ कॅरेटसाठी ५८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५५ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार २०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७० हजार ५०० रुपये होता. सनासुदीत हे दर आता चढतीवरच राहण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवले.