नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठ्या कपातीच्या घोषणेनंतर नागपूरसह देशभरात सातत्याने सोने- चांदीचे दर घसरत होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याने प्रति दहा ग्राम ७० हजारांवर गेले होते. सोमवारी (५ ऑगस्ट) नागपुरात सोन्याच्या दरात प्रत्येक दीड ते दोन तासात चढ- उतार बघायला मिळत आहे. परंतु  दर कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (५ ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजता बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ९०० रुपये होते. हे दर एक तासानंतर ११.३० वाजता २०० ते ३०० रुपयांनी घसरले. ११.३० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ७०० रुपये होते.

Paper Pulp Ganesha Idols
कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती! वजनदार मूर्तींना पर्याय; गिरगावातील सार्वजनिक मंडळांचा पर्यावरणपूरक उत्सवासाठी पुढाकार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
decrease in gold prices todays gold rate Nagpur news
सोन्याच्या दरात घसरण…लाडकी बहीणींचा आनंद द्विगुनीत…

हेही वाचा >>>सावधान…! आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नाव वापरून लाखोंची फसवणूक…

दरम्यान, सोमवारी दुपारी १२.३० वाजता हे दर आणखी घसरले.  २४ कॅरेट सोन्याचे दर ७० हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ६०० रुपये होते. तर दुपारी १.३० वाजता मात्र दरात किंचित वाढ नोंदवली गेली. यावेळी २४ कॅरेट सोन्याचे दर ७० हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ७०० रुपये होते.

चांदीचे दर असे…

नागपुरात ५ ऑगस्टला बाजार उघडल्यावर  सकाळी १०.३० वाजता चांदीचे दर ८३ हजार ६०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले.  एक तासाने  दरात घसरण झाल्यावर ८३ हजार रुपये दर झाले.  दुपारी १२.३० वाजता ८२ हजार ५०० रुपये होते. तर १.३० वाजता ८३ हजार नोंदवले गेले.

हेही वाचा >>>“सूचनापत्रावर सुटका झाल्यानंतर कारागृहात स्थानबध्द करता येणार नाही…” उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने…

अर्थसंकल्पानंतर असे होते दर…

 नागपुरातील सराफा बाजारात अर्थसंकल्पापूर्वीच्या दिवशी सोमवारी (२२ जुलैला) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर अर्थसंकल्प असलेल्या दिवशी अर्थसंकल्प जाहिर झाल्यावर सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली. या दिवशी (२३ जुलै) संध्याकाळी नागपुरातील सराफा बाजार बंद होतांना २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले.