नागपूर : नागपूरसह सर्वत्र लग्नाची लगबग वाढली. लग्न असलेल्या कुटुंबियांकडून वर- वधूसाठी दागिने करण्यासाठी सराफा व्यवसायिकांकडेही गर्दी होऊ लागली . परंतु अद्यापही सोन्याचे दर नियंत्रणात येत नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दराच चांगलीच वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. परंतु त्यानंतर पुन्हा दर वाढले. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये होते. लक्ष्मीपूजनाला (१ नोव्हेंबर) हे दर वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले होते. परंतु त्यानंतर दरात घट झाली.

Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Silver prices fall and gold prices also change
चांदीच्या दरात घसरण… सोन्याच्या दराने…
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
what is sham marriage
‘Sham Marriage’मुळे सरकार चिंतेत; सिंगापूरमध्ये वाढणारा लग्नाचा हा ट्रेंड काय आहे?
Wildebeest animal brutally attacked by lion
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम
Wedding video groom denies chain from father in law during marriage viral video on social media
जावई नंबर १! भरलग्नात नवरदेवाने सासऱ्यांचा आग्रह नाकारला, ‘ती’ गोष्ट घेण्यास दिला नकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Bride groom video husband picked up his wife while gruhpravesh after wedding newly weds couple video viral on social media
असा गृहप्रवेश प्रत्येक मुलीचा असावा! नवरदेवाने बायकोला चक्क उचलून घेतलं अन्…, लग्न करणाऱ्या मुलांनी ‘हा’ VIDEO एकदा बघाच

हेही वाचा…स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना

नागपुरात तीन दिवसांपूर्वी ९ डिसेंबरला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ७०० रुपये होते. या दरात आणखी वाढ होऊन नागपुरातील सराफा बाजारात ११ डिसेंबरला दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार ८०० रुपये दर नोंदवले गेले. त्यामुळे ९ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर निघालेल्या सोन्याच्या दराच्या तुलनेत ११ डिसेंबरला नागपूरात सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये १ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार २०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ हजार १०० रुपये प्रति दहा ग्राम अधिक नोंदवले गेले.

हेही वाचा…आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…

चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ…

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीली (२९ ऑक्टोंबर) प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर ९ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता ९१ हजार १०० रुपये प्रति किलो होते. ते ११ डिसेंबरला दुपारी ९४ हजार ३०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे ९ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर निघालेल्या सोन्याच्या दराच्या तुलनेत ११ डिसेंबरला नागपूरात चांदीचे दर तब्बल ३ हजार २०० रुपये प्रति किलोने अधिक होते.

Story img Loader