नागपूर : सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून सतत घसरण झाल्याने हे दर निच्चांकीवर आले होते. हे ७० हजार रुपयापर्यंत खाली जाणार काय? हा प्रश्न ग्राहकांना पडला होता. परंतु आता सोन्याच्या दरात पुहा बदल होऊन हे दर वाढू लागले आहे. सोन्याच्या सोमवारच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

दिवाळीत सोन्याचे दर उच्चांकीवर असल्यावरही नागपूरसह देशभरात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने- चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली. नागपुरातील सराफा बाजारत धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये होते. हे दर लक्ष्मीपूजनाला (१ नोव्हेंबर) वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले. त्यानंतर दरात घसरण सुरू झाली.

Gold and silver prices rise by Rs 3,100 per 10 grams and Rs 4,000 per kilogram in the past week.
Gold Rate : आठवड्याभरात सोन्याचे भाव हजारो रुपयांनी वाढले, चांदीही चकाकली
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
सोन्याच्या दरात चारच तासात बदल… अर्थसंकल्पांतर पुन्हा…
gold rates news in marathi
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण… परंतु थोड्याच वेळाने…
Union Budget 2025 Gold Silver Price
Gold Silver Price Today : अर्थसंकल्पापूर्वी सोन्याचा दर ८२ तर चांदी ९३ हजार पार; दरात होतील का मोठे बदल? जाणून घ्या आजचे दर
Gold silver price
Gold silver Rate Today : सोन्याचा दर ८१ हजारावर, चांदीही महागली, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील २२, २४ कॅरेट सोन्याचा दर
Gold prices surge above Rs 83,000 in the spot market and hit a lifetime high on MCX.
Gold Price : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे सोने तेजीत, सोने खरेदीचा योग्य दर काय?

हेही वाचा…नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?

नागपुरात १४ नोव्हेंबरला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ४०० रुपये असे निच्चांकीवर नोंदवले गेले. हे दर सोमवारी (१८ नोव्हेंबर) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात १४ नोव्हेंबरच्या तुलनेत १८ नोव्हेंबरला २४ कॅरेटमध्ये ६०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ५०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ५०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ४०० रुपये प्रति दहा ग्राम अशी किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान भविष्यात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता सराफा व्यवसायिकांकडून वर्तवली जात असून हा सोने- चांदीच्या दागिन्यात गुंतवणुकीसाठी चांगला काळ असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

हेही वाचा…नाना पटोले हे स्वयंघोषित मुख्यमंत्री, खासदार प्रफुल पटेल

चांदीच्या दरातही वाढ…

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोंबरला प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर १४ नोव्हेंबरला ८९ हजार रुपये प्रति किलो नोंदवले गेले. हे दर सोमवारी (१८ नोव्हेंबर) ९० हजार १०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे नागपुरात चांदीच्या दरात १४ नोव्हेंबरच्या तुलनेत १८ नोव्हेंबरला तब्बल १ हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे.

Story img Loader