नागपूर: करोनानंतर सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. मध्यंतरी चांदीचे दर प्रति किलो एक लाख रुपयाहून अधिकवर गेले होते. परंतु आता या दरात घट झाली आहे. तर सोन्याच्या दरातही मोठे बदल झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे. शुक्रवारी (२१ मार्च २०२५ रोजी) सोने- चांदीचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.

सोन्याचे दर सातत्याने वाढत असून रोज नवीन विक्रमी उंचावर जातांना दिसत आहे. मागील मागील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट बघायला मिळाली होती. केंद्र सरकारने सोन्यावरील सिमा शुल्क कमी केल्याने हे दर कमी झाले होते. परंतु त्यानंतर पून्हा सातत्याने दरवाढ होऊन बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचिवर पोहचले आहे. त्यातच होळीतील धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी या सोन्याच्या दराने उंचीचा आणखी एक नवीन विक्रम केला आहे.

नागपुरातील सराफा बाजारात होळीच्या एक दिवसापूर्वी ११ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८६ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर आज शुक्रवारी (२१ मार्च २०२५ रोजी) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६९ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ७०० रुपये नोंदवले गेले.

त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात ११ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत २१ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी २ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ८०० रुपये आणखी वाढल्याचे नोंदवले गेले. त्यामुळे लग्नसमारंभ, वाढदिवसासह इतर कार्यक्रमात दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरन आहे.

चांदीच्या दरात मात्र घट

नागपुरातील सराफा बाजारात २० मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो १ लाख ७०० रुपये होते. हे दर धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (१५ मार्च २०२५ रोजी) प्रति किलो १ लाख ५०० रुपये रुपये नोंदवले गेले. तर २१ मार्च २०२५ रोजी हे दर ९६ हजार ७०० रुपये प्रति किलो होते. त्यामुळे २० मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत २१ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो २ हजार रुपयांनी घटले आहे.

Story img Loader