नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नागपूरसह देशभरात सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. त्यानंतर सातत्याने कधी वाढ तर कधी दरात घट होतानाचे चित्र आहे. दरम्यान नवरात्रीपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत असून बुधवारी (१७ ऑक्टोबर) दिवाळीपूर्वी सोन्याच्या दराने नवीन उच्चांक गाठला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरात्रीपूर्वी ३० सप्टेंबरला नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर सकाळी ११ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता दिवाळी तोंडावर आहे. या सणामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक दागिनेही खरेदी करतात. परंतु सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

हे ही वाचा…‘समृद्धी’वरील अपघाताचे सत्र थांबता-थांबेना; कारची ट्रकला धडक, चालक ठार

नागपुरातील सराफा बाजारात बुधवारी (१७ ऑक्टोबर) दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार रुपये नोंदवले गेले. तर प्लॅटिनमचेही दर १७ ऑक्टोबरला सकाळी ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. दरम्यान हल्लीच्या सोन्याच्या दरातील मोठ्या बदलामुळे सराफा व्यवसायिकांमध्येही चिंता वाढली आहे. परंतु सराफा व्यवसायिकांकडून मात्र हे दर आणखी वाढण्याचे संकेत असून आताच्या काळात सोने- चांदीमध्ये गुंतवणूक लाभदायक असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान १७ ऑक्टोबरला (बुधवारी) सकाळी सोन्याचे दर आजपर्यंच्या इतिहासात सर्वोच्च असल्याचा दावा नागपुरातील सराफा व्यवसायिक करत आहे. दिवाळीच्या काळात सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…अवकाळी पावसाचे संकट! राज्यात येत्या २४ तासात…

चांदीच्या दरातही मोठी वाढ

३० सप्टेंबरला नागपुरातील सराफा बाजारात चांदीचे दर ९१ हजार ८०० रुपये होते. हे दर दिवाळीच्या तोंडावर १७ ऑक्टोबरला दुपारी ९१ हजार ७०० रुपये नोंदवण्यात आले. यामुळे दिवाळीच्या काळात चांदीच्या लक्ष्मीसह इतर देवांची चित्र असलेली नाणी महागण्याची दाट शक्यता आहे.

लग्नासह इतर समारंभाचे नियोजन असलेले कुटुंबीय चिंतेत

लग्न, बारसेसह इतरही अनेक कार्यक्रमात नागरिक भेट म्हणून सोने- चांदीच्या वस्तू देतात. अनेक कुटुंब या कार्यक्रमासाठी दागिने खरेदी करतात. परंतु यंदा दरवाढीमुळे लग्नासह इतर समारंभाचे नियोजन असलेल्या कुटुंबियांनाही आर्थिक बोझा सहन करावा लागू शकतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold price will be rise before diwali mnb 82 sud 02