लोकसत्ता टीम

नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठी कपात केल्यानंतर घोषणेनंतर नागपूरसह देशभरात प्रथम सोने- चांदीचे दर घसरले. परंतु कालांतराने पुन्हा दरवाढ सूरू होऊन ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर ७० हजारावर पोहचले होते. परंतु आता पुन्हा दर घसरत असून गुरूवारी हे दर निच्चांकी पातळीवर असल्याचे नोंदवले गेले. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today sunday 27 october before Diwali 2024
Gold Price Today: दिवाळीच्या आधीच सोन्याने गाठला ८० हजाराचा टप्पा, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
The prices of gold and silver have steadily increased
सोने-चांदी अजून झळकणार की झाकोळणार?
Gold price Today
Gold Silver Price : सोने आणखी महागले! सोन्याचा दर ७९ हजारांवर; जाणून घ्या, खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील दर
drop in gold and silver prices before Diwali
दिवाळीपूर्वीच सोने- चांदीच्या दरात घट… हे आहे आजचे दर…
Gold will cross the mark of 85 thousand in Diwali
दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…
Gold Price Today
४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सोन्याने दिला भरघोस परतावा; २०२४ मध्ये तब्बल ३२.५ टक्क्यांचा नफा
Gold and silver prices hike
Gold & Silver Prices Surge : चांदी लाखमोलाची; सोन्याची आगेकूच सुरूच

नागपुरातील सराफा बाजारात १ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. हळू- हळू दरवढीनंतर ३ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर आणखी वाढल्याचे संकेत असतांनाच आता दर घसरत आहे.

आणखी वाचा-घरा-घरांत डासांची उत्पत्ती; सतर्क रहा, अन्यथा…

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात गुरूवारी (८ ऑगस्टला) दुपारी सोन्याचे दर निच्चांकी पातळीवर नोंदवले गेले. सराफा बाजारात ८ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार रुपये नोंदवले गेले. तर प्लॅटिनमचेही दर प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये नोंदवले गेले. दरम्यान सध्याच्या आंतराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीमुळे हे दर घसरल्याचा दावा सराफा व्यवसायिकांच्या जेम या संघटनेचे राजेश रोकडे यांनी केला. परंतु लवकरच हे दर पून्हा वाढण्याचे संकेत देत सध्या दर कमी असल्याने सोने- चांदीमध्ये गुंतवणूक फायद्याची असल्याचा दावाही त्यांनी केला.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील रस्त्याचे काम रोखले; स्वपक्षीय संघटनेचा…

चांदीच्या दरातही मोठी घसरण

नागपुरातील सराफा बाजारात ८ ऑगस्टला चांदीचे दर ७९ हजार ४०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. हे दर २ ऑगस्टला रात्री बाजार बंद होतांना ८४ हजार ६०० रुपये तर ३ ऑगस्टला ८२ हजार ८०० रुपये प्रति किलो होते. त्यामुळे चांदीच्या दरातही सातत्याने मोठी घट होत असल्याचे चित्र आहे.

दागिने खरेदीसाठी इच्छुकांना लाभ

नागपूरसह राज्यात आजही लग्न, बारसे, वाढदिवसासह इतरही कार्यक्रमात बरेच जण सोने- चांदीच्या भेटवस्तू देतात. हे कार्यक्रम सातत्याने होत असतात. त्यामुळे सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुकांना लाभ होणार आहे.