लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यात मागील काही महिन्यांपासून सातत्याने सोने- चांदीचे दर वाढत होते. दिवाळीमध्ये हे दर नवीन उच्चांकावर गेले, तरी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोने- चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली गेली. आता हळू- हळू सोन्याचे दर कमी होत आहे. मागील सहा दिवसांत सोन्याचे दर चांगलेच म्हणजे सुमारे २,१०० ते ३,१०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी आहे.

gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर
On Wednesday November 6 Nagpur saw slight fall in silver prices and increase in gold prices
दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरात बदल; एकात वाढ, दुसऱ्यात घट…

नागपुरात धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (१ नोव्हेंबर) बाजार बंद होतांना नागपुरात सोन्याचे दर वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ६०० रुपये होते. त्यानंतर दरात घसरण झाली.

आणखी वाचा-थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…

दरम्यान नागपुरात ६ नोव्हेंबरला बाजार उघडल्यावर नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. हे दर सोमवारी (१२ नोव्हेंबर) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात ६ नोव्हेंबरच्या तुलनेत १२ नोव्हेंबरला २४ कॅरेटमध्ये ३,१०० रुपये, २२ कॅरेटमध्ये २,९०० रुपये, १८ कॅरेटमध्ये २,४०० रुपये, १४ कॅरेटमध्ये २,१०० रुपये प्रति दहा ग्राम घट झाली आहे.

आणखी वाचा-नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा

चांदीचे दरातही मोठी घसरण

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोंबरला प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (१ नोव्हेंबर) हे दर प्रति किलो ९६ हजार ५०० रुपये होते. त्यानंतर सातत्याने चांदीचे दर कमी झाले. परंतु ६ नोव्हेंबरला चांदीचे दर प्रति किलो ९४ हजार ३०० रुपये होते. या दरात ४ हजार ३०० रुपयांची घट होऊन हे दर १२ नोव्हेंबरला ९० हजार रुपये नोंदवले गेले.