लोकसत्ती टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : केंद्र सरकारने मंगळवारच्या अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठी कपात केल्यापासून सलग दुसऱ्याही दिवशी बुधवारी (२४ जुलै) सोन्याच्या दरात नागपुरात घसरण बघायला मिळाली. नागपुरातील सराफा बाजारात दुपारी सोन्याचे दर अनेक महिन्यानंतर ७० हजाराहून खाली प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. त्यामुळे हे या वर्षातील निच्चांकी दर होते.

नागपुरातील सराफा बाजारात बुधवारी (२४ जुलै) बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ४०० रुपये नोंदवण्यात आले. दरम्यान हे दर अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (२२ जुलैला) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये नोंदवण्यात आले होते.

आणखी वाचा-आणखी दोन दिवस पावसाचे! कुठे धो-धो, तर कुठे…

दरम्यान अर्थसंकल्पानंतर नागपुरात सातत्याने सोन्याच्या दरात घसरणीचा क्रम सुरू होता. हे दर अर्थसंकल्पानंतर नागपुरातील सराफा बाजार बंद होतांना २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे २३ जुलैच्या रात्रीच्यादराच्या तुलनेत २४ जुलैच्या दुपारचे दर बघितल्यास सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम १०० रुपयांची आणखी घसरन नोंदवली गेली. परंतु चांदीचे दर मात्र काल रात्री व आज दुपारी प्रति किलो ८५ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. दरम्यान नागपुरात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसे यासह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट म्हणून दिली जातात. त्यामुळे सोने- चांदीचे दर कमी झाल्याने आता सराफा बाजाराकडे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांकडून वर्तवली जात आहे.

आणखी वाचा-समाजमाध्यमावरील मैत्री जिवावर बेतली! दिल्लीच्या तरुणीची मूर्तिजापूरात हत्या; कामाच्या शोधात…

प्लॅटेनियमच्या दरातही मोठी घसरण

नागपुरातील सराफा बाजारात प्लॅटेनियम धातूचा दरही २२ जुलैच्या संध्याकाळी ६ वाजता बाजार बंद होतांना प्रति दहा ग्राम ४४ हजार रुपये नोंदवण्यात आला होता. हा दर अर्थसंकल्प सादर झाल्यावर दुसऱ्या दिवशी २३ जुलैला संध्याकाळी ६ वाजता ४३ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली आले होते. हे दर आज बुधवारी (२४ जुलै) ४३ हजार रुपये नोंदवण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices at lows further fall in prices mnb 82 mrj