नागपूर : महाशिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने सोन्याचे दर वाढून नवीन विक्रमी उंचीवर जात असतानाच दरात घसरण झाल्याने सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी उच्छुक असलेल्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात गुरुवारी (२७ फेब्रुवारी २०२५) सोन्याचे दर काय होते, त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
महाशिवरात्रीच्या दिवशी (२६ फेब्रुवारी २०२५ रोजी) नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ८४ हजार ४०० रुपये प्रति १० ग्राम होते. हे दर त्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजे २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८६ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार ३०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर महाशिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी (२७ फेब्रुवारी २०२५ रोजी) घटल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान नागपुरात २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८६ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार रुपये नोंदवले गेले होते. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात २५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या तुलनेत २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे. दर किंचित घसरल्याने लग्न समारंभासह इतर कार्यक्रमानिमित्त सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात पून्हा वाढ होण्याचे संकेत दिले जात आहे.
चांदीच्या दरातही घसरण…
नागपुरातील सराफा बाजारात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९६ हजार ४०० रुपये होते. हे दर महाशिवरात्रीच्या दिवशी (२६ फेब्रुवारी २०२५) ९६ हजार रुपये प्रति किलो तर गुरूवारी (२७ फेब्रुवारी २०२५ रोजी) ९५ हजार ४०० रुपये प्रति किलो होते. त्यामुळे नागपुरात चांदीच्या दरातही २५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या तुलनेत २७ फेब्रवारी २०२५ रोजी प्रति किलो १ हजार रुपयांची घट झालेली दिसत आहे.