नागपूर : सोने चांदीचे दर अद्यापही नियंत्रणात नाहीत. दिवाळीत सोन्याचे दर विक्रमी उंचीवर असतांनाही पुढे ते आणखी वाढेल म्हणून नागपूरकरांनी जोरात दागिन्यांची खरेदी केली. परंतु त्यानंतर दर घसरल्याने ग्राहकांची निराशा झाली. दरम्यान आता बारा दिवसांत सोन्याच्या दरात घट झाली असतांना चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांचे टेंशन वाढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये होते. लक्ष्मीपूजनाला (१ नोव्हेंबर) दर वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले.

हेही वाचा…वर्धा : नौदलाची कॅप प्राप्त होताच आईच्या डोक्यावर चढवून केला कडक सॅल्युट

नागपुरात २५ नोव्हेंबरला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार २०० रुपये होते. हे दर बारा दिवसानंतर ६ डिसेंबरला दुपारी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २५ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या तुलनेत ६ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याच्या दरात २४ कॅरेटमध्ये ६०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ६०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ५०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ४०० रुपये प्रति दहा ग्राम अशी घट नोंदवण्यात आली. दरम्यान, भविष्यात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने- चांदीच्या दागिन्यात गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचाही सराफा व्यावसायिकांचा दावा आहे.

हेही वाचा…गोंदिया: भंगार बसेस धावतात रस्त्यावर! शिवशाही अपघातानंतरही एसटी विभाग निंद्रावस्थेतच

चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ…

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीली (२९ ऑक्टोंबर) प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर २५ नोव्हेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर ९० हजार ३०० रुपये प्रति किलो होते. हे दर शुक्रवारी (६ डिसेंबर) दुपारी ९२ हजार रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे नागपुरात चांदीच्या दरात मागील बारा दिवसांत १ हजार ७०० रुपयांची मोठी वाढ झाल्याची माहिती आहे.