नागपूर: सोन्याच्या दरात मध्यंतरी सातत्याने घसरण होत होती. परंतु त्यानंतर दरवाढ सुरू झाली. दरम्यान शुक्रवारी (११ एप्रिल २०२५ रोजी) सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर वाढण्याचे संकेत व्यापाऱ्यांकडून मिळत होते. परंतु दोनच  तासात सोन्याचे दर घसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) सोन्याचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.

हल्ली लग्नसराईचे दिवस असल्याने सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. त्यातच नागपुरात पंधरा दिवसांपूर्वी सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु मागच्या आठवड्यात या दरात घसरण सुरू झाली. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात शुक्रवारी (११ एप्रिल २०२५ रोजी) सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९३ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार रुपये होते.

दरम्यान दोन तासांनी दुपारी १२.३० वाजता सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८६ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६० हजार ६०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे दोनच तासात नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून मात्र सोन्याचे दर येत्या काळात आंतराष्ट्रिय घडामोडी बघता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करोनानंतर दरात सातत्याने वाढ

करोनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने कर कमी केल्याने दरात घसरण झाली होती. परंतु त्यानंतर पून्हा सातत्याने सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे.

चांदीच्या दरात उलट स्थिती

नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता (११ एप्रिल २०२५ रोजी) चांदीचे दर प्रति किलो ९३ हजार १०० रुपये होते. हे दर दोन तासांनी १२.३० वाजता प्रति किलो ९३ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील बाजारात दोनच तासात चांदीचे दर प्रति किलो ३०० हजार रुपयांनी वाढलेले दिसत आहे. त्यामुळे सोन्याचे दर घसरले असतांना मात्र चांदीच्या दरात मात्र वाढ झालेली दिसत आहे.