नागपूर: सोन्याचे दर सातत्याने वाढत असून बघता- बघता हे दर विक्रमी उंचीवर पोहचले आहे. आता लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने ग्राहकांमध्ये दागिने खरेदीबाबत चिंता वाढली आहे. त्यातच गुरूवारी (३ एप्रिल २०२५ रोजी) एक आनंदवार्ता पुढे आली आहे. नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर वाढण्याचे संकेत होते. परंतु तीनच तासात सोन्याच्या दरात गुडीपाडव्यानंतर प्रथमच घसरण नोंदवली गेली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नागपुरात प्रत्येक वर्षी गुढीपाडवाच्या दिवशी ग्राहक इतर वस्तूंसोबतच मोठ्या प्रमाणात सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. हल्ली लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यातच नागपुरात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर असल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजार गुरूवारी (३ एप्रिल २०२५ रोजी) सकाळी १०.३० वाजता उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९१ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८५ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये होते. त्यामुळे मागील काही दिवसांतील चिन्ह बघता सोन्याचे दर आणखी वाढण्याचे संकेत होते.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात दुपारी तीन तासांनी १.३० वाजता सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८५ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५९ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे तीनच तासात नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे तीनच तासात सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून मात्र सोन्याचे दर येत्या काळात आंतराष्ट्रिय घडामोडी बघता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चांदीच्या दरातही मोठे बदल…

नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर गुरूवारी सकाळी १०.३० वाजता (३ एप्रिल २०२५ रोजी) चांदीचे दर प्रति किलो ९८ हजार ९०० रुपये होते. हे दर तीनच तासांनी १.३० वाजता प्रति किलो ९७ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील बाजारात तीनच तासात चांदीचे दर प्रति किलो १ हजार १०० रुपयांनी घटल्याचे दिसत आहे.