नागपूर : दिवाळीत उच्चांकीवर असलेले सोन्याचे दर आता झपाट्याने खाली येत आहे. ही दरातील घसरण बघता येत्या काही दिवसांत सोन्याचे दर ७० हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली येणार का? हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. परंतु या विषयावर सराफा व्यवसायिकांचे वेगळे मत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात यंदाच्या धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (१ नोव्हेंबर) हे दर आणखी वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले. त्यानंतर दरात सतत घसरण होत आहे.

हेही वाचा…सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?

नागपुरात ६ नोव्हेंबरला बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ४०० रुपये होते. हे दर गुरूवारी (१४ नोव्हेंबर) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात ६ नोव्हेंबरच्या तुलनेत १४ नोव्हेंबरला २४ कॅरेटमध्ये ४,५०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ४,२०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ३,५०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ३ हजार रुपये प्रति दहा ग्राम घट झाली आहे. ही घट बघता येत्या काळात हे दर २४ कॅरेटमध्ये ७० हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली येणार काय? हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. परंतु सराफा व्यवसायिकांचे वेगळे मत आहे. सराफा व्यवसायिकांच्या मते सध्या सोन्याचे दर घटल्याने ग्राहकांना दागिने खरेदीची चांगली संधी आहे. परंतु येत्या काळात हे दर चांगलेच वाढण्याचा अंदाजही सराफा व्यवसायिक वर्तवत आहे.

हेही वाचा…Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…

चांदीच्या दरातही मोठी घसरण

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोंबरला प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर ६ नोव्हेंबरला ९४ हजार ३०० रुपये प्रति किलो होते. तर १४ नोव्हेंबरला ८९ हजार रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात ६ नोव्हेंबरच्या तुलनेत १४ नोव्हेंबरला तब्बल ५ हजार ३०० रुपयांची घट झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices dropping post diwali it will reach 70000 per 10 grams soon mnb 82 sud 02