नागपूर: केंद्र सरकारने मंगळवारी अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. परिणामी नागपुरातील सराफा बाजारात सकाळी बाजार उघडल्यापासून दुपारपर्यंत सोने- चांदीचे दर प्रति दहा ग्राम चक्क ७२ हजाराहून कमी झाले. त्यामुळे दागीने खरेदीचा बेत असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपुरातील सराफा बाजारात मंगळवारी (२३ जुलै) बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले होते. तर अर्थसंकल्प सादर झाल्यावर काही तासांनीच म्हणजे १.१० वाजता हे दर मोठ्या प्रमाणात घसरले.
हेही वाचा – Video : चालकाला आततायीपणा नडला, पुरात ट्रॅक्टर वाहून गेला; थरारक व्हिडीओ एकदा पाहाच…
दरम्यान नागपुरात मंगळवारी दुपारी १.१० वाजता हे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७१ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात अर्थसंकल्पाच्या दिवशी केवळ अडिच तासात २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटच्या दरात १ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटच्या दरात १ हजार १०० रुपये तर १४ कॅरेट सोन्याच्या दरात चक्क १ हजार रुपयांची घट झालेली दिसत आहे. त्यामुळे सोने- चांदीचे दागीने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच नागपुरात एक दिवसांपूर्वी म्हणजे २२ जुलैला दुपारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये होते, हे विशेष.
चांदीच्या दरात तब्बल २,५०० रुपयांची घट
नागपूर सराफा बाजारात २३ जुलैच्या सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता चांदीचे दर प्रति किलो ८८ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले होते. हे दर अडिच तासांनी म्हणजे १.१० वाजता ८६ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात अडिच तासात चक्क २ हजार ५०० रुपयांची घट झाली आहे. हे दर २२ जुलैला दुपारी ८९ हजार १०० रुपये नोंदवले गेले होते, हे विशेष.
या कार्यक्रमांमध्ये दागीने भेट दिली जातात
नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसे यासह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट म्हणून दिली जातात. त्यामुळे सोने- चांदीचे दर कमी झाल्याने आता सराफा बाजाराकडे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांकडून वर्तवली जात आहे.
गुंतवणूक व बचतीला प्रोत्साहन मिळणार- राजेश रोकडे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या मागणीनुसार सोने- चांदीवरील सीमाशुल्कात कपात करण्यात आली. त्यामुळे सोने- चांदीवरील घरगुती गुंतवणूक आणि बचतीमध्ये वाढ होईल. सोने- चांदीसह इतर धातूच्या व्यवसायात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण होईल. आता दागिन्याचे दर कमी झाल्याने हा काळ गुंतवणुकीसाठी चांगला आहे, असे मत ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे उपाध्यक्ष व नागपुरातील रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी व्यक्त केले.
साडेसात तासात सोन्याचे दर, ३ हजारांनी घसरले
नागपुरात अर्थसंकल्पाच्या दिवशी सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत साडेसात तासात २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार रुपये, २२ कॅरेटच्या दरात २ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटच्या दरात २ हजार ३०० रुपये तर १४ कॅरेट सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची घट झाली. तर चांदीच्या दरात प्रति किलो २ हजार ७०० रुपयांची घट झाली.