नागपूर: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केल्यावर दुसऱ्या दिवशी २ फेब्रुवारीला नागपुरात सोन्याचे दर वाढून ६३ हजार ५०० रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले होते. परंतु सोन्याच्या दरात घसरन झाल्याने शुक्रवारी (९ फेब्रुवारी) हे दर २९ हजार ९०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील सोन्याच्या दरांमध्ये चढ- उतार थांबण्याचे नाव घेत नाही. नागपुरात ९ फेब्रुवारीला २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजार ९०० रुपये प्रति दहा ग्राम होते. हे दर २२ कॅरेटसाठी ५९ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ३०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ९०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ४०० रुपये होता. दरम्यान हे दर २ फेब्रुवारीच्या दुपारी २४ कॅरेट सोन्याचे दर ६३ हजार ५०० रुपये प्रति दहा ग्राम होते. हे दर २२ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ५०० रुपये होता. दरम्यान सोन्याच्या दरात सतत बदल होत असले तरी काही महिन्यात हे दर ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

हेही वाचा – साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांचा संघर्षातून स्वयंसिद्धतेकडे एकल प्रवास!

हेही वाचा – इटलीचे पार्सल इटलीमध्ये परत पाठवा! बावनकुळे यांचे वक्तव्य

नागपुरातील यापूर्वीचे दर…

नागपुरात २९ जानेवारीला सकाळी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये होता. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता. २५ जानेवारीला हे दर २४ कॅरेटसाठी ६२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार १०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ९०० रुपये होता. तर २४ जानेवारीला २४ कॅरेटचा दर ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices fall again these are todays rates mnb 82 ssb
Show comments