नागपूर: नागपूरसह देशभरात सातत्याने सोन्याच्या दरात बदल होत असल्याने ग्राहकांमध्येही दागिने खरेदीबाबत संभ्रम आहे. २४ तासांपूर्वी ९ जुलैरोजी सकाळी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी बघायला मिळाली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी हे दर प्रती दहा ग्राम सुमारे ४०० रुपये ते ६०० रुपये दरम्यान घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे दागिने खरेदीचा बेत रचणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिली जातात. त्यामुळे आताही लग्नसराईचे कार्यक्रम सुरू असल्याने या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कमी- अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहे. त्यामुळे आताही नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे रोजच कमी- अधिक गर्दी दिसत आहे.

हेही वाचा >>>काँग्रेसची उमेदवारी हवी, तर अर्जासोबत द्यावा लागणार पक्ष निधी

नागपुरातील सराफा बाजारात ९ जुलैला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७३ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये होते. हे दर दुसऱ्या दिवशी ९ जुलैला दुपारी तीन वाजता २४ कॅरेटसाठी ७२ हजार ६०० रूपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ५०० रूपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार २०० रुपये होते. त्यामुळे ८ जुलैच्या तुलनेत ९ जुलैला नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४०० रुपये कमी झाल्याचे नोंदवले गेले. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी सध्या सोने- चांदीच्या दरात घट झालेली दिसत असली तरी ती लवकरच वाढण्याचे संकेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या घसरलेले दर ग्राहकांना दागिने खरेदीची चांगली संधी असल्याचा त्यांचा दावा आहे.

चांदीच्या दरात मात्र वाढ

नागपूर सराफा बाजारात ८ जुलैच्या सकाळी ९ वाजता चांदीचे दर प्रति किलो ९२ हजार रुपये नोंदवण्यात आले होते. हे दर ९ जुलैच्या दुपारी ३ वाजता ९२ हजार २०० रुपये किलो नोंदवण्यात आले. त्यामुळे चांदीच्या दरात मात्र प्रति किलो तब्बल २०० रुपयांची वाढ झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी हे होते दर…

नागपुरातील सराफा बाजारात २२ जूनला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७१ हजार ८००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ८००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८९ हजार रुपये होते. त्यामुळे सोन्यच्या दरात पंधरादिवसांत चांगलीच वाढ झालेली दिसत आहे.