नागपूर: सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) नागपुरातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात अनेक दिवसानंतर घट नोंदवली गेली. त्यामुळे लग्नासह विविध कार्यक्रमासाठी सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान शुक्रवारी सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील सराफा बाजारात व्हेलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८५ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. हे दर दोन दिवसानंतर १७ फेब्रुवारी २०२५ रोजी किंचित वाढले होते. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात सातत्याने सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे.

दरम्यान नागपुरात २० फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८६ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार ४०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे २० फेब्रुवारी २०२५ रोजीच्या तुलनेत २१ फेब्रुवारी २०२५ रोजी नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३०० रुपये कमी नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात…

केंद्र सरकारने मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्कात ६ टक्केपर्यंत कमी केल्यावर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पानंतर मात्र सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे.

चांदीच्या दरातही आपटी…

नागपुरातील सराफा बाजारात २० फेब्रुवारी २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९७ हजार ८०० रुपये होते. हे दर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) ९७ हजार ८०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले. त्यामुळे चांदीच्या दरातही ७०० रुपये प्रति किलो घट झालेली दिसत आहे.