नागपूरः नागपूरात सोमवारी सोन्याचे दर ५९ हजार ९०० रुपयांवरून रात्री ८ वाजता ६० हजार २०० रुपये प्रति दहा ग्रामवर गेले होते. काही तासानंतर मंगळवारी (१ ऑगस्ट २०२३) सकाळी ११ वाजता नागपुरातील सराफा बाजारात हे दर घसरून ६० हजार रुपयांवर खाली आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार १ एप्रिल २०२३ रोजी येथे प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७५ हजार ३०० रुपये होते. हे सोन्याचे दर २४ जुलै २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ८०० रुपये होते.

हेही वाचा… निवडणुकांची चाहूल; नागपुरात ईव्हीएमची प्राथमिक तपासणी सुरू

तर चांदीचे दर प्रति किलो ७५ हजार १०० रुपये होते. हे सोन्याचे दर १९ जुलै २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार १०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार १०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार १०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७६ हजार ४०० रुपये होते. सनासुदीत पुढे हे दर वाढण्याची शक्यता रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी लोकसत्ताशी बोलतांना वर्तवली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices fall in nagpur mnb 82 dvr