लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : नागपूरसह देशभरात सातत्याने सोन्याच्या दरात बदल होत असल्याने ग्राहकांमध्येही दागिने खरेदीबाबत संभ्रम आहे. २४ तासांपूर्वी २१ जून २०२४ रोजी सकाळी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी बघायला मिळाली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी हे दर प्रति दहा ग्राम सुमारे १ हजार ते १,२०० रुपयांनी खाली घसरले आहे. त्यामुळे शनिवारी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिली जातात. त्यामुळे आताही या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कमी- अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहे.

आणखी वाचा-बुलढाणा : वृध्द पुरात वाहून गेला; शोधमोहीम सुरू

त्यामुळे आताही नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे गर्दी आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात २२ जूनला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७१ हजार ८००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ८००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८९ हजार रुपये होता.

दरम्यान नागपुरात २१ जूनला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७३ हजार रूपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ९००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९१ हजार ०० रुपये होता. त्यामुळे २२ जूनच्या तुलनेत २१ जून २०२४ रोजीचे दर बघितल्यास नागपुरात सोने- चांदीच्या दरात चांगलीच घसरण बघायला मिळत आहे.

आणखी वाचा-नागपूर : एकटेपणातून नैराश्य; आयुष्याला कंटाळून वृद्ध पती-पत्नीने घेतला गळफास

वरील आकडेवारीनुसार २४ तासांत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी १ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो २ हजार ४०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे शनिवारी ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी सध्या सोने- चांदीच्या दरात घट झालेली दिसत असली तरी ती लवकरच वाढण्याचे संकेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या घसरलेले दर ग्राहकांना दागिने खरेदीची चांगली संधी असल्याचा त्यांचा दावा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices fall sharply in 24 hours know what is todays rates mnb 82 mrj