लोकसत्ती टीम

नागपूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठी कपात केल्यापासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरणीचा क्रम शुक्रवारीही नागपुरसह देशभरात कायम होता. परंतु गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी मात्र नागपुरात चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचे दर घसरल्याने दागीने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

नागपुरातील सराफा बाजारात शुक्रवारी (२६ जुलै) दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६८ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६३ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५३ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४४ हजार ६०० रुपये नोंदवण्यात आले. हे दर अर्थसंकल्पापूर्वीच्या दिवशी सोमवारी (२२ जुलैला) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर अर्थसंकल्प असलेल्या दिवशी अर्थसंकल्प जाहिर झाल्यावर सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली.

आणखी वाचा-राज्यात जलजन्य आजारांची साथ! ‘ही’ काळजी घ्या…

या दिवशी (२३ जुलै) संध्याकाळी नागपुरातील सराफा बाजार बंद होतांना २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे २३ जुलैच्या रात्रीच्यादराच्या तुलनेत २६ जुलैच्या दुपारचे दर बघितल्यास सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम १ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार १०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ९०० रुपयांची घसरन नोंदवली गेली. परंतु प्लॅटिनमचे दर मात्र प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये नोंदवण्यात आले. हे दर अर्थसंकल्पापूर्वी ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम होते.

आणखी वाचा-गोंदिया: “भाजपने मला मूर्ख बनवलं” माजी आमदाराचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

हे आहेत चांदीचे दर..

नागपुरातील सराफा बाजारात अर्थसंकल्प जाहिर झालेल्या दिवशी (२३ जुलै) रात्री बाजार बंद होतांना चांदीचे दर प्रति किलो ८५ हजार ८०० रुपये होते. हे दर २६ जुलैच्या दुपारी ८२ हजार ५०० रुपये प्रति किलो होते. तर एक दिवसापूर्वी म्हणजे २५ जुलैला रात्री ८२ हजार २०० रुपये होते. त्यामुळे गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी चांदीच्या दरात मात्र ३०० रुपये प्रति किलो वाढ नोंदवण्यात आली आहे.

नागपुरात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसे यासह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट म्हणून दिली जातात. त्यामुळे सोने- चांदीचे दर कमी झाल्याने आता सराफा बाजाराकडे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांकडून वर्तवली जात आहे.