नागपूर: वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. नागपुरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी (९ नोव्हेंबर) नागपुरात प्रति दहा ग्रॅम २४ कॅरेट सोने ६० हजार ५०० रुपये नोंदवले गेले. हे दर ८ नोव्हेंबरला ६१ हजार रुपये होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह राज्याच्या बऱ्याच भागात दिवाळीत नागरिक सोने- चांदीपासून बनवलेले दागिन्यांसह इतरही वस्तू खरेदी करतात. त्यामुळे सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना लाभ होणार आहे. नागपुरातील सराफा बाजारात ९ नोव्हेंबरच्या सकाळी १०.३० वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार ५०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार ३०० रुपये होते.

हेही वाचा – अमरावती : अर्धवेळ नोकरीच्या नावावर १३ लाखांची फसवणूक

हेही वाचा – कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यापासून

दरम्यान नागपुरात ९ नोव्हेंबरला चांदीचे दर प्रति किलो ७२ हजार ६०० रुपये होते. हे दर ८ नोव्हेंबरच्या सकाळी १०.३० वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६१ हजार रुपये, २२ कॅरेटचे दर ५८ हजार रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७१ हजार ७०० रुपये होते. दरम्यान दर कमी झाल्याने ग्राहकांना दिवाळीत सोने-चांदीचे दागिने खरेदीची चांगली संधी असल्याचे ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) उपाध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices fell on the first day of diwali know today rates in nagpur mnb 82 ssb