लोकसत्ता टीम
नागपूर: लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले असून ग्राहकांमध्ये चिंता आहे. त्यातच गुरूवारी (१७ एप्रिल २०२५ रोजी) सोन्याचे दर दोन तासातच दोनदा घसरले. तर चांदीच्याही दरात घसरण बघायला मिळाली. त्यामुळे सोने- चांदीचे दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान गुरूवारी सोन्याचे दर काय होते? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
हल्ली लग्नसराईचे दिवस असल्याने सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. त्यातच नागपुरात २५ दिवसांपूर्वी सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु मागच्या आठवड्यात या दरात घसरण झाली असली तरी त्यानंतर पून्हा दरवाढीने हे दर विक्रमी उंचीवर पोहचले आहे. त्यातच गुरूवारी नागपुरातील सराफा बाजार जास्त दरावर उघडला. परंतु त्यानंतर सलग दोन तासात दोनदा सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली.
नागपुरातील सराफा बाजारात गुरूवारी (१७ एप्रिल २०२५ रोजी) सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९५ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८९ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार २०० रुपये होते. हे दर एक तासांनी सकाळी ११.३० वाजता २४ कॅरेटसाठी ९५ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार १०० रुपये नोंदवले गेले. तर त्याच्या एक तासांनी १२.३० वाजता २४ कॅरेटसाठी ९५ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या तुलनेत दोन तासांनी दुपारी १२.३० वाजता नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४०० रुपये कमी झाल्याचे दिसत आहे.
करोनानंतर दरात सातत्याने वाढ
करोनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने कर कमी केल्याने दरात घसरण झाली होती. परंतु त्यानंतर पून्हा सातत्याने सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे.
चांदीच्या दरात उलट स्थिती
नागपुरात गुरूवारी सकाळी १०.३० वाजता (१७ एप्रिल २०२५ रोजी) चांदीचे दर प्रति किलो ९६ हजार ६०० रुपये, ११.३० वाजता प्रति किलो ९६ हजार ६०० रुपये तर ११.३० वाजता प्रति किलो ९६ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे गुरूवारी दोन तासात नागपुरात चांदीचे दर प्रति किलो ५०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे.