नागपूर: नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ६० हजारांहून पुढे गेले होते. परंतु आता सोन्याचे दर पुन्हा घसरले आहे. मंगळवारी (१७ ऑक्टोंबर) दुपारी साडेबारा वाजता नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ५९ हजार ५०० रुपये नोंदवले गेले.
हेही वाचा – अकोल्यातील मोर्णा, विद्रूपा नदीच्या पूरनियंत्रण रेषेला स्थगिती
हेही वाचा – भंडारा : संतप्त प्रवाशांचा बस स्थानकासमोर राडा, तब्बल तासभर बसेस स्थानकावर अडविल्या
नागपुरातील सराफा बाजारात १७ ऑक्टोबरच्या दुपारी साडेबारा वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७१ हजार ८०० रुपये होते. हे दर १४ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे ६० हजार रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७२ हजार १०० रुपये होते. हे दर ९ ऑक्टोबरला प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५४ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३७ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ६९ हजार ७०० रुपये होते. दरम्यान, सध्या दर कमी झाले असले तरी येत्या काही दिवसांत ते वाढण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी दिले.