नागपूर: सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. तीन दिवसांपूर्वी सोन्याचे दर घसरले होते. परंतु पून्हा लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. सोन्याचे दर सोमवारी (२३ डिसेंबर) काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. परंतु त्यानंतर पून्हा दर मोठ्या प्रमाणात वाढले. हल्ली लग्नाचा हंगाम सुरू आहे. लग्नामध्ये वर- वधूला सोन्याची साखळी, मंगळसुत्रासह इतरही दागिने भेट देणे अथवा स्वत:साठी बनवून घेतले जातात. त्यासाठी सर्व डंसराफा दुकानात ग्राहकांची गर्दी होते. परंतु मागील तीन दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

हेही वाचा : “शासकीय कर्मचाऱ्यांनाच साक्षीदार करा,” उच्च न्यायालयाने असा सल्ला का दिला?

नागपुरात २० डिसेंबरला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार २०० रुपये होते. या दरात तीन दिवसानंतर २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी बाजार उघडल्यावर मोठी वाढ झाली. हे दर सोमवारी (२३ डिसेंबर) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे २० डिसेंबरच्या तुलनेत २३ डिसेंबरला नागपुरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. हे दर २४ कॅरेटमध्ये ८०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ७०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ७०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ५०० रुपये प्रति दहा ग्रामने वाढले आहे. सोन्याच्या दरातील वाढ येत्या काळात आणखी होण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून दिले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीतील गुंतवणूक लाभदायक असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

हेही वाचा : समृद्धी महामार्गावर अपघातांसह गुन्हेगारीतही वाढ; डिझेल चोरीसाठी महागड्या वाहनांचा वापर…

चांदीच्या दरामध्ये घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात २० डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता चांदीचे दर ८६ हजार ४०० रुपये प्रति किलो होते. हे दर २३ डिसेंबरला दुपारी ८८ हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे २० डिसेंबरच्या तुलनेत नागपुरात २३ डिसेंबरला चांदीच्या दरात तब्बल २ हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे.

Story img Loader