नागपूर : सोन्याच्या दरात मागील काही महिन्यांपासून सातत्याने बदल होण्याचा क्रम कायम आहे. दिवाळीच्या दरम्यान हे दर उच्चांकावर होते. परंतु त्यानंतर हळू- हळू दरात घसरण हऊन ते ७५ हजार रुपये प्रति दहा ग्रामहून खाली घसरले. आता पून्हा सोन्याच्या दरात वाढ होऊन मोठे बदल होतांना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरसह राज्यातील अनेक भागात दिवाळीत सोन्याचे दर उच्चांकीवर असतांनाही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली. नागपुरातील सराफा बाजारत धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये होते. हे दर लक्ष्मीपूजनाला (१ नोव्हेंबर) वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले.

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

हेही वाचा…राज्यभरातील कारागृहात तब्बल ७९ टक्के कच्चे कैदी; शासनावर वाढतोय आर्थिक भार

नागपुरात १८ नोव्हेंबरला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ८०० रुपये असे नोंदवले गेले. हे दर गुरूवारी (२१ नोव्हेंबर) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात १८ नोव्हेंबरच्या तुलनेत २१ नोव्हेंबरला २४ कॅरेटमध्ये १ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ हजार १०० रुपये प्रति दहा ग्राम अशी वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान भविष्यात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने- चांदीच्या दागिन्यात गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचाही सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

हेही वाचा…आता वीस रुपये घ्या, जिंकून आल्यास नोट दाखवून हजार न्या…गोंदियात उमेदवाराचे अफलातून आमिष…

चांदीच्या दरातही वाढ…

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोंबरला प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर १८ नोव्हेंबरला ९० हजार १०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. हे दर गुरूवारी (२१ नोव्हेंबर) ९१ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे नागपुरात चांदीच्या दरात १८ नोव्हेंबरच्या तुलनेत २१ नोव्हेंबरला तब्बल १ हजार ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

Story img Loader