नागपूर : अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात खूपच चढ- उतार बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दार प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत वाढले होते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून दरात सतत घसरण होत आहे. शुक्रवारी (२४ मे) सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर गेल्या महिनाभरातील निच्चांकी पातळीवर आलेले दिसत आहे. त्यामुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह सर्वत्र मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार रुपयांपर्यंत विक्रमी उंचीवर पोहोचले होते. त्यानंतर हे दर प्रति दहा ग्राम ७२ हजारांहून खाली घसरले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेत ७३ हजार ३०० रुपयांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर काही दिवस दरात घसरण झाली असली तरी त्यानंतर हे दर पुन्हा विक्रमी उंचीवर पोहचले.

हेही वाचा…राज्याचा नवा शालेय अभ्यासक्रम खटकतोय ? ‘या’ मुदतीत नोंदवा आक्षेप…

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार शुक्रवारी (२४ मे) हे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७२ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार १००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ८९ हजार ७०० रुपये होते.

दरम्यान, नागपूर सराफा बाजारातील दरानुसार गुरूवारी (२३ मे) हे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार २००, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ८९ हजार ९०० रुपये होते. त्यामुळे २४ तासात नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम सोन्यासाठी चक्क एक हजार रुपयांनी कमी झालेले दिसत आहे. त्यामुळे लग्न, बारसेसह विविध कार्यक्रमानिमित्त दागिने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा…छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान; शस्त्रे जप्त

नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून आंतराष्ट्रीय घडामोडीचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असून त्यामुळेच दर वाढत असल्याचा दावा केला जात आहे.

चार दिवसांपूर्वी ७५ हजार रुपये होते सोन्याचे दर

नागपूर सराफा बाजारात २० मे रोजी दुपारी २ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ८००, १८ कॅरेटसाठी ५८ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ९३ हजार ८०० रुपये होते. त्यामुळे आजचे दर बघता सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे.

हेही वाचा…उष्णतेची लाट लावतेय वैदर्भीयांची वाट, सूर्य ओकू लागलाय आग!

चांदीच्याही दरातही किंचित घसरण

नागपूरसह देशभरात मध्यंतरी चांदीच्या दरात खूप वाढ झाली होती. परंतु नागपूर सराफा बाजारात २३ मे २०२४ रोजी चांदीचे दर प्रति किलो ८९ हजार ९०० रुपये किलो नोंदवले गेले. २४ तासानंतर २४ मे रोजी चांदीच्या दारात किंचित घसरण झाली आहे. हे दर शुक्रवारी ८९ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे दर २०० रुपयांनी कमी झालेले दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices plunge in nagpur offering relief to jewelry buyers mnb 82 psg