नागपूर : नागपूरसह राज्यात सोन्याचे दर वाढण्याचा क्रम थांबत नाही. २७ फेब्रुवारीच्या तुलनेत नागपुरात ४ मार्चला सोन्याच्या दरात २४ कॅरेटमध्ये तब्बल १ हजार २०० रुपये प्रति दहा ग्राम वाढ झाली. त्यामुळे नागपुरात सोमवारी सोन्याचे २४ कॅरेटचे दर ६३ हजार ८०० रुपये दहा ग्राम असे नोंदवले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरसह राज्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सातत्याने सोन्याचे दर वाढत असल्याने लग्नासह इतर कारणाने सोने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबामध्ये चिंता वाढली आहे. नागपूरसह राज्यात मध्यंतरी सातत्याने सोन्याचे दर कमी- जास्त होत होते. परंतु फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याचे दर सतत वाढत आहे. नागपुरात सोमवारी (४ मार्च) दुपारी १२.४० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार ८०० रुपये होते. तर २२ कॅरेटचे दर ५९ हजार ३००, १८ कॅरेटसाठी ४९ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४१ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ६०० रुपये होते.

हेही वाचा…भंडारा : १२८ गुण घेणारा पात्र आणि १३२ गुण घेणारा अपात्र कसा ?, निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवित…

दरम्यान नागपुरात २७ फेब्रुवारीच्या सकाळी १०.३० वाजता हे सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५८ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४८ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४० हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ५९ हजार ८०० रुपये होते. तर १२ फेब्रुवारीला २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार रुपये होते. दरम्यान नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांकडून २४ कॅरेट सोन्याचे दर काही महिन्यातच वाढून ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा…वर्धा : दोन दिवसात चार वासरांचा फडशा, गावकऱ्यांनी आणली वनखात्यास जाग…

सात दिवसांतील दरवाढ किती?

नागपूर सराफा बाजारातील २७ फेब्रुवारी २०२४ आणि ४ मार्च २०२४ दरम्यान सोन्याच्या दराची तुलना केल्यास २४ कॅरेट सोन्याच्या दरात आठवड्याभरात १,२०० रुपये प्रति दहा ग्राम, २२ कॅरेटसाठी १,१०० रुपये, १८ कॅरेटसाठी १,००० रुपये, १४ कॅरेटसाठी ८०० रुपये प्रति दहा ग्राम वाढ नोंदवली गेली.