नागपूर: नागपुरात १४ फेब्रुवारी २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर घसरून ६१ हजार ९०० रुपयेपर्यंत खाली आले होते. परंतु आता हे दर झपाट्याने वाढत आहे. आज २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दोनच तासात सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने लग्नासह इतर कारणाने सोने खरेदीचा बेत असलेल्यांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा >>> भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीकेचे आसूड, समाजाचे नेते रामदास तडसच असल्याचा तैलिक संघटनेचा ठराव
नागपूरसह राज्यात मध्यंतरी सातत्याने सोन्याचे दर कमी- जास्त होत होते. परंतु गेल्या काही दिवसांत पून्हा सोन्याचे दर वाढू लागले आहे. नागपुरात सोमवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६२ हजार ५०० रुपये होते. परंतु दोनच तासात दुपारी १२.२० वाजता हे दर ६२ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे येथे सातत्याने सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे.
दरम्यान नागपुरात सोमवारी दुपारी १२.२० वाजता २२ कॅरेटचे दर ५८ हजार २००, १८ कॅरेटसाठी ४८ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४० हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७० हजार ६०० रुपये होते. १४ फेब्रुवारीला हे सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६१ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५८ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४९ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४० हजार २०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ६९ हजार ९०० रुपये होते. तर १२ फेब्रुवारीला २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार रुपये होते.
हेही वाचा >>> महिला उपजिल्हाधिकाऱ्याने शासनाचे कोट्यवधी रुपये हडपले, गंभीर गुन्हे दाखल
दर ६५ हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज
नागपुरात २ फेब्रुवारीला २४ कॅरेटसाठी ६३ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ५०० रुपये होते. त्यानंतर सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. तर नागपुरातील सराफा व्यवसायीकांकडून हे दर येत्या काही महिन्यांमध्ये ६५ हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.