नागपूर: सोन्याचे दर नियंत्रणात येत नसून रोज नवीन विक्रमी दराची नोंद केली जात आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्येही चिंता आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी १ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर जीएसटी वगळून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८५ हजार ३०० रुपये नोंदवण्यात आले होते. एक महिन्यानंतर १ एप्रिल २०२५ रोजी या दरात तब्बल ६ हजार रुपयांचा फरक पडला आहे. या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरात प्रत्येक वर्षी गुढीपाडवाच्या दिवशी ग्राहक इतर वस्तूंसोबतच मोठ्या प्रमाणात सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. परंतु यंदाच्या दिवशी गुढीपाडव्याला नागपुरात सोन्याचे दर चांगलेच वाढल्याचे चित्र होते. त्यानंतरही काही सराफा व्यवसायिकांकडे पूर्वीच्या तुलनेत ग्राहकांनी सोन्याची चांगलीच खरेदी केली. तर काही सराफा व्यवसायिकांकडून मात्र यंदा व्यवसाय दरवाढीमुळे कमी झाल्याचे मत नोंदवले गेले.

दरम्यान नागपुरात एक महिन्यापूर्वी १ मार्च २०२५ रोजी सकाळी सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८५ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ४०० रुपये नोंदवले गेले होते.

दरम्यान नागपुरात मंगळवारी (१ एप्रिल २०२५ रोजी) सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८५ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे हे दर आजपर्यंतचे नागपुरातील सोन्याचे विक्रमी दर आहे. दरम्यान नगापुरात १ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत १ एप्रिल २०२५ रोजी एक महिन्याच्या कालावधीत सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४ हजार रुपयांनी वाढलेले दिसत आहे.

चांदीच्या दरातही मोठे बदल…

नागपुरातील सराफा बाजारात १ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९४ हजार ७०० रुपये होते. हे दर आज मंगलवारी (१ एप्रिल २०२५ रोजी) प्रति किलो १ लाख १ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील बाजारात १ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत १ एप्रिल २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ६ हजार ७०० हजार रुपयांची वाढलेले दिसत आहे.